नवी दिल्ली – सोन्याच्या दरात घसरण चालूच असून बुधवारी सोन्याचा दर पन्नास रुपयांनी कमी होऊन 77,750 रुपये प्रति दहा ग्रॅम झाला. सध्या सोन्याचा दर चार आठवड्याच्या निचांंकी पातळीवर रेंगाळत आहे. चांदीच्या दरात बाराशे रुपयांची वाढ होऊन चांदीचा दर 92,500 रुपये प्रति किलो या पातळीवर गेला.
दागिन्यासाठी सोन्याची मागणी कायम आहे मात्र गुंतवणुकीसाठी सोन्याची मागणी देशात आणि विदेशात कमी होत असल्यामुळे सोन्याच्या दरात घसरण होत आहे.
जागतिक वायदे बाजारात सोन्याचा दर आठ टक्क्यांनी कमी होऊन 2,614 डॉलर आणि चांदीचा दर 0.85 टक्क्यानी वाढून 31.02 प्रति औंस या पातळीवर गेला. अमेरिकेच्या अध्यक्षपदावर डोनाल्ड ट्रम्प यांची निवड झाल्यानंतर सुरक्षित गुंतवणूक मिळून सोन्याचे आकर्षण कमी झाले आहे. तर शेअर बाजार आणि बिटकॉइनचे आकर्षण वाढल्या वाढले आहे.