Gold rate today : सलग तिसऱ्या दिवशी सोने वधारले

Gold Rate : नवी दिल्ली – जागतीक बाजातून सकारात्मक संदेश येत असल्यामुळे भारतीय सराफात सलग तिसऱ्या दिवशी सोने आणि चांदीच्या दरात भरीव वाढ नोंदली गेली. ( ​Gold Price in India Today )

दिल्ली सराफात सोन्याचे 347 रुपयांनी वाढून 48,758 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले.  त्याचबरोबर दिल्ली सराफात तयार चांदीच्या दरात 606 रुपयांची वाढ होऊन चांदीचा दर 65,814 रुपये प्रति किलो झाला.

जागतिक बाजारात सोन्याचे दर वाढवून 1,854 डॉलर प्रति औंस व चांदीचे दर 25.28 डॉलर प्रति औंस झाले. मोतीलाल ओसवाल फायनान्शिअल सर्व्हिसेसचे उपाध्यक्ष नवनीत दमाणी यांनी सोन्याचे दर वाढत असल्याबद्दल सांगितले की, अमेरिका करोनाचा सामना करण्यासाठी अधिक खर्च करणार असल्याचे अमेरिकेच्या अर्थमंत्री जेनेट येलेन यांनी सुचित केल्यामुळे सोन्याचे दर वाढत आहेत.

भारत आपल्या गरजेचे सोने आयात करतो. त्यामुळे जागतिक बाजारातील दरवाढीच्या प्रमाणात भारतातील सोन्याच्या दरात वाढ होत आहे. 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.