नवी दिल्ली – जागतिक संकेतानुसार दिल्ली सराफात सोन्याचा दर 54 रुपयांनी कमी होऊन 46,448 रुपये प्रति दहा ग्रॅम झाला. तयार चांदीचा दर 178 रुपयांनी कमी होऊन 59,217 रुपये प्रति किलो झाला. जागतिक बाजारात सोन्याचा दर कमी होऊन 1,794 डॉलर व चांदीचा दर 22.28 डॉलर प्रति औंस झाला.
एचडीएफसी सिक्युरिटीज या संस्थेचे विश्लेषक तपन पटेल यांनी सांगितले की, अमेरिकेच्या रोख्यावरील परतावा कमी होत आहे. त्याचबरोबर डॉलर वधारत असल्यामुळे सोन्याची विक्री होत असल्याचे जागतिक पातळीवर वातावरण आहे. त्यामुळे सोन्याच्या दरात घट होत आहे.