नवी दिल्ली – जागतिक संकेताप्रमाणे शुक्रवारी दिल्ली सराफात सोन्याचा दर 271 रुपयांनी कमी होऊन 46,887 रुपये प्रति दहा ग्रॅम झाला. तयार चांदीचा दर 687 रुपयांनी कमी होऊन 63,210 रुपये प्रति किलो झाला.
जागतीक व भारतातील वायदे बाजारात सोन्याचे दर कमी झाल्यामुळे स्पॉट गोल्डचे दर कमी झाले असल्याचे एचडीएफसी सिक्युरिटीज या संस्थेचे विश्लेषक तपन पटेल यांनी सांगितले. ते म्हणाले की, पुढील काही काळ सोन्याचे दर अस्थिर राहण्याची शक्यता आहे.