नवी दिल्ली – अमेरिकेची रिझर्व बॅंक असलेल्या फेडरल रिझर्वदे नजीकच्या काळात व्याजदरात वाढ करण्यात येणार नसल्याचे सांगितल्यानंतर डॉलर कमकुवत झाल्यामुळे जागतिक बाजारात सोन्याचे दर वाढले. त्यामुळे भारतीय बाजारातही सोने आणि चांदीच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ नोंदली गेली.
दिल्ली सराफात सोन्याचा दर 382 रुपयांनी वाढून 46,992 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. त्याचबरोबर तयार चांदीचा दर 1,280 रुपयांनी वाढून 66,224 रुपये प्रति किलो या पातळीवर गेला.
जागतिक आणि भारतीय वायदे बाजारात सोन्याचे दर वाढल्यामुळे त्या प्रमाणात स्पॉट मार्केटमध्येही सोन्याचे दर वाढले असल्याचे मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेसचे उपाध्यक्ष नवनीत दमानिया यांनी सांगितले.