नवी दिल्ली – जागतिक संकेताप्रमाणे गुरुवारी भारतीय बाजारात सोन्याच्या दरात 195 रुपयांची वाढ होऊन सोन्याचा दर 46,625 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. तयार चांदीचा दरही 569 रुपयांनी वाढून 61,763 रुपये प्रति किलो या पातळीवर गेला.
एचडीएफसी सिक्युरिटीज या संस्थेचे विश्लेषक तपन पटेल यांनी सांगितले की, जागतिक बाजारात सोन्याचे दर अस्थिर आहेत. त्याचा परिणाम भारतातील सोन्याच्या दरावर होत आहे. मात्र दीर्घ पल्ल्यात सोन्याचे दर वाढण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सूचित केले.