नवी दिल्ली – गेल्या काही दिवसात सोन्याच्या दरात वाढ होत होती. त्यामुळे काही गुंतवणूकदारांनी नफा काढून घेण्यासाठी विक्री केल्यामुळे मंगळवारी सोन्याच्या दरात 23 रुपयांची घट होऊन सोन्याचा दर 47,814 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला.
तयार चांदीचा दर केवळ पाच रुपयांनी कमी होऊन 61,835 रुपये प्रति किलो या पातळीवर गेला. जागतीक बाजारात सोन्याचा दर कमी होऊन 1,817 डॉलर प्रति औंस झाला. तयार चांदीचा दर 22.94 डॉलर प्रति औंस या पातळीवर होता.
आज सोन्याचे दर काही प्रमाणात कमी झाले असले तरी आगामी काही महिने तरी सोन्याचे दर उच्च पातळीवर राहण्याची शक्यता आहे. कारण महागाई वाढत असल्यामुळे मागाईपासून बचाव करण्यासाठी गुंतवणूकदार सोन्याची खरेदी करण्याची शक्यता असल्याचे विश्लेषकांनी सांगितले.