नवी दिल्ली – दिल्ली सराफात सोन्याच्या दरात 59 रुपयांची घट होऊन सोन्याचा दर 46,038 रुपये प्रति दहा ग्रॅम झाला. तयार चांदीचा दर 196 रुपयांनी कमी होऊन 60,369 रुपये प्रति किलो झाला.
डॉलर वधारत असल्यामुळे आणि अमेरिकेच्या कर्जरोख्यावरील परतावा वाढत असल्यामुळे सोन्यातील गुंतवणूक कमी होत आहे. त्यामुळे जागतिक बाजारात सोने घसरत असल्यामुळे सोन्याचे दर कमी होत असल्याचे विश्लेषकांनी सांगितले. एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक तपन पटेल म्हणाले की, जागतिक वायदे बाजारातील दरानुसार भारतीय बाजारात सोन्याचे दर कमी झाले आहेत.