Gold Rates : सोन्याच्या दरात वाढ

नवी दिल्ली – सोन्याचे दर सध्या कमी पातळीवर असल्यामुळे काही गुंतवणूकदारांकडून निवडक खरेदीचा आधार सोन्याला मिळत आहे. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून सोन्याच्या दरात वाढ होत आहे.

गुरुवारी सोन्याचा दर 422 रुपयांनी वाढून 45,560 रुपये प्रति दहा ग्रॅम झाला. तयार चांदीचा दर 113 रुपयांनी वाढून 61,314 रुपये प्रति किलो या पातळीवर गेला.

जागतिक बाजारात सोन्याची मागणी वाढल्यामुळे सोन्याचा दर वाढून 1,756 डॉलर तर चांदीचा दर 23.44 डॉलर प्रति औंस या पातळीवर गेला.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.