नवी दिल्ली – रशिया- युक्रेन युद्धामुळे जागतिक पातळीवर सोने आणि चांदीचे दर अस्थिर आहेत. या पार्श्वभूमीवर गुरुवारी भारतीय सराफात सोन्याचा दर केवळ 9 रुपयांनी वाढून 51, 568 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला.
यार चांदीचा दर मात्र 224 रुपयांनी वाढून 66,139 रुपये प्रति किलो या पातळीवर गेला. यासंबंधात एचडीएफसी सिक्युरिटीज या संस्थेचे विश्लेषक दिलीप परमार यांनी सांगितले की, अमेरिका व्याजदर वाढ करणार असल्यामुळे आगामी काळात सोन्याच्या दरांमध्ये काही प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे. आज जागतिक बाजारात सोन्याचा दर वाढून 1,926 डॉलर व चांदीचा दर 24.28 डॉलर प्रती औंस या पातळीवर गेला होता.