नवी दिल्ली – जागतिक बाजारात सध्या सोन्याचे दर अस्थिर आहेत. त्या पार्श्वभूमीवर दिल्ली सराफात सोन्याचा दर 196 रुपयांनी कमी होऊन 46,581 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला.
तयार चांदीचा दर 146 रुपयांनी कमी होऊन 59,878 रुपये प्रति किलो झाला आहे.
याबाबत बोलताना एचडीएफसी सेक्युरीटीज विश्लेषक तपन पटेल यांनी सांगितले की, जागतिक पातळीवर आरोग्यविषयक परिस्थिती अनिश्चित झाली आहे. त्याचा परिणाम सोने आणि चांदीच्या बाजारावर होत आहे. त्यामुळे आगामी काळात या दोन धातूचे दर अस्थिर राहण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.