#Gold Rate Today : सोन्याच्या किंमतीत तब्बल ‘एवढ्या’ टक्क्यांनी वाढ; जाणून घ्या आजचा लेटेस्ट भाव…

नवी दिल्ली –  देशासह राज्यात दररोज मोठ्या संख्येने कोरोनाबाधित आढळून येत असून, रूग्णांच्या मृत्यू संख्येतही तेवढ्याच वेगाने मोठी वाढ होत आहे. त्यामुळे राज्य सरकार कडून अनेक राज्यात कडक निर्बंध घालण्यात आले आहेत. या निर्बधांचा फटका सर्व गोष्टींवर बसला आहे.

त्यामुळे गेले काही दिवस सोन्याच्या आणि चांदीच्या किंमतीत सातत्याने चढ-उतार होताना पहायला मिळतंय. आणि याच घसरणीनंतर भारतीय बाजारात आज (3 मे) सोने आणि चांदीच्या दरात तेजी आल्याचे दिसून येत आहे.

आज भारतीय बाजारात सोन्याच्या किंमतीत  0.6 टक्क्यांनी वाढ होऊन 47004 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. त्याचबरोबर, चांदी 0.6 टक्क्यांनी वाढून 68,789 रुपये प्रति किलो झाली आहे. तर दुसरीकडे रेकॉर्ड पातळीवर सोन्याच्या किंमतींमध्ये 9000 रुपयांची घसरण झाल्याचे दिसून येत आहे. गेल्या आठवड्या भरापासून सोने आणि चांदीच्या दरात चांगलाच चढ-उतार दिसून येत आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Comments are closed.