Gold Rate Today | सोन्या – चांदीच्या दरात घट; जाणून घ्या आजचे दर

नवी दिल्ली – जागतिक वायदे बाजारात सोन्याचे दर कमी झाल्यानंतर दिल्ली सराफातही सोने आणि चांदीचे दर कमी झाले असल्याचे दिसून आले.

दिल्ली सराफा बाजारात बुधवारी सोन्याचे दर 231 रुपयांनी कमी होऊन 48,421 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले. तयार चांदीचे दर दिल्ली सराफत 256 रुपयांनी कमी होऊन 65,614 रुपये प्रति किलो या पातळीवर गेले. 

मोतीलाल ओसवाल फायनान्स सर्विसेस उपाध्यक्ष नवनीत दमानी यांनी सोने आणि चांदीच्या दराबाबत सांगितले की, अमेरिकेच्या रिझर्व्ह बॅंकेचे पतधोरण लवकरच जाहीर होणार आहे. 

त्यामुळे विविध बाजारातील गुंतवणूकदार विक्री करीत आहेत किंवा कुंपणावर बसून आहेत. पतधोरण जाहीर झाल्यानंतर विविध बाजारांना दिशा मिळू शकेल

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.