Gold Rate Today : सोने-चांदीच्या दरात घट

नवी दिल्ली – सोने आणि चांदीचे दर सध्या तुलनेने जास्त पातळीवर आहेत. त्यातच रुपयाच्या मूल्यात सुधारणा झाल्यामुळे बुधवारी भारतीय बाजारात सोने आणि चांदीच्या दरात काही प्रमाणात घट झाली.
बुधवारी दिल्ली सराफ सोन्याचे दर 71 रुपयांनी कमी होऊ 51,125 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले. तयार चांदीचा दर 156 रुपयांनी कमी होऊन 70,082 रुपये प्रति किलो झाला. सकाळी रुपयाचा भाव स्थिर पातळीवर होता. मात्र नंतर त्यात वाढ झाली.

जागतिक बाजारात सोन्याचे दर 1,949 डॉलर प्रति औंस तर चांदीचे दर 27.54 डॉलर प्रति औंस या पातळीवर स्थिर होते. विविध बाजारातील एकूण परिस्थिती पाहता दीर्घ पल्ल्याच्या गुंतवणुकदारांसाठी सोन्याचे दर 50 हजाराच्या खाली गेल्यास खरेदी योग्य राहील असे विश्‍लेषक सुचवितात. सध्या सोन्याचे दर या पातळीपेक्षा बरेच जास्त आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.