नवी दिल्ली – जागतिक संकेताप्रमाणे दिल्ली सराफात सोमवारी सोन्याचा दर 84 रुपयांनी कमी होऊन 47,053 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला.
त्याचबरोबर तयार चांदीचा दर 369 रुपयांनी कमी होऊन 61,037 रुपये प्रति किलो झाला. जागतीक बाजारात सोन्याचा दर कमी होऊन 1,823 डॉलर व चांदीचा दर 23.11 डॉलर प्रति औंस या पातळीवर होता.
याबाबत बोलताना एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक तपन पटेल यांनी सांगितले की, सध्या जागतिक बाजारात सुट्टी आहे. त्यामुळे धातूंचे दर अस्थिर राहण्याची शक्यता आहे. मात्र भारतामध्ये लग्नाच्या हंगामामुळे सोन्याच्या खरेदीत काही प्रमाणात वाढ होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.