नवी दिल्ली – डॉलर वधारत असल्यामुळे आणि शेअर बाजाराचे निर्देशांक वाढत असल्यामुळे जागतिक बाजारात सोन्याच्या दरात घट नोंदली गेली. त्यामुळे भारतीय बाजारातही सोन्याचे दर कमी झाले. दिल्ली सराफात सोन्याचा दर 365 रुपयांनी कमी होऊन 45,141 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. तयार चांदीचा दर मात्र 21 रुपयांनी वाढून 59,429 रुपये प्रति किलो झाला.
आगामी काळात औद्योगिक उत्पादन वाढणार असल्यामुळे चांदीचे मागणी वाढण्याची शक्यता असल्यामुळे चांदीच्या दरात वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. जागतिक बाजारात सोन्याचा दर 1,754 डॉलर व चांदीचा दर 22.68 डॉलर प्रति औंस या पातळीवर राहिला.
याबाबत मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसचे उपाध्यक्ष नवनीत दमानिया यांनी सांगितले की, आर्थिक परिस्थिती सुधारण्याचे लक्षणे असल्यामुळे बरेच गुंतवणूकदार शेअर बाजाराकडे वळू लागले असल्यामुळे सोन्यातील गुंतवणूक कमी होत आहे. त्यामुळे सोन्याच्या दरात काही प्रमाणात घट झाली असल्याचे दिसून येत.े आगामी काळामध्ये भारतामध्ये बरेच सण येणार असल्यामुळे भारतात मात्र सोन्याची खरेदी वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.