नवी दिल्ली – जगतीक पातळीवर महागाई वाढणार असल्यामुळे गुंतवणूकदार आता सोने खेरेदीकडे वळत असल्यामुळे सोन्याच्या दरात वाढ होत आहे. सोमवारी दिल्ली सराफात सोन्याचा दर 119 रुपयांनी वाढून 46,919 रुपये प्रति दहा ग्रॅम झाला.
त्याचबरोबर तयार चांदीचा दर 745 रुपयांनी वाढून 60,777 रुपये प्रति किलो या पातळीवर गेला. एचडीएफसी सिक्युरीटीज या संस्थेचे विश्लेषक तपन पटेल यांनी सांगितले की, महागाई वाढणार असल्यामुळे अमेरीकन कर्जरोख्यावरील परतावा वेगाने कमी होत असल्यामुळे सोन्याची खरेदी वाढून सोन्याचे दर वाढत आहेत.
ओमायक्रॉनमुळे निर्माण झालेली परिस्थिती पुर्ववत होईपर्वंत सोन्याचे दर चढे राहण्याची शक्यता त्यांना वाटते.