नवी दिल्ली – जागतिक बाजारातून सकारात्मक संकेत आल्यामुळे भारतीय बाजारपेठेत आज सोन्याच्या दरात वाढ झाली.दिल्ली सराफात सोन्याचे दर 103 रुपयांनी वाढवून 51,286 रुपये प्रति दहा ग्रॅम झाले. त्याचबरोबर तयार चांदीचा दर 793 रुपयांनी वाढवून 62,155 रुपये प्रति किलो झाला.
जागतिक बाजारात आज सोन्याचे दर 1885 रुपये प्रति औंस तर चांदीचे दर 23.83 डॉलर प्रति औंस होते. डॉलर मजबूत होत असूनही अमेरिकेतील निवडणुकांमुळे सोन्याचे दर काहीसे जास्त पातळीवर आहेत, असे विश्लेषकांनी सांगितले.