नगर – या आठवड्यात सोन्याचे भाव अधिकच वाढल्याने ग्राहकांनी सोने खरेदी सध्या थांबवल्याचं चित्र सराफ बाजारात दिसतंय. आज दिवसभर सराफ बाजारात ग्राहकांची फारशी सोने खरेदी करण्यासाठी गर्दी नव्हती. सोन्याच्या भावाने सध्या उच्चाकांची पातळी गाठली आहे.
आज दिवसभरात सराफ बाजारात सोन्याचे भाव वाढले होते. 24 कॅरेट आणि 22 कॅरेट सोन्याच्या भावात प्रत्येकी 50 रुपये भाव वाढ दिसून आली. यात 22 कॅरेट सोन्याचे भाव प्रति दहा ग्रॅम प्रमाणे 38,090 रूपये, 24 कॅरेट सोन्याचे भाव 38,850 रूपये, 23 कॅरेट सोन्याचे भाव 38,265रूपये, तर 23.5 कॅरेट सोन्याचे भाव 38560 रूपये इतके होते.
सोन्याची तेजी पाहून चांदीचे भावही वाढले. आज चांदीचे भाव प्रति किलो 46,400 रूपये होते. सोन्या- चांदीच्या भावात तेजी आल्यामुळे, नवीन सोनं फारसं खरेदी होत नाही. ग्राहक जुनं सोनं देऊन, नवीन सोनं खरेदी आहेत.असे बोरा ज्वेलर्सचे संचालक अतुल रसिकलाल बोरा यांनी सांगितले आहे.
सोन्याचे भाव वाढले असल्यामुळे सोने खरेदी – विक्रीच्या व्यवसायात ग्राहकांची मंदीच आहे. दिवाळीपर्यंत सोन्याचे भाव वाढत जातील, असं वाटत.
अमित पोखरणा , पोखरणा ज्वेलर्स