नवी दिल्ली – जागतिक बाजारातील संकेतानुसार भारतीय बाजारात सोन्याचे दर शुक्रवारी वाढले. मात्र मागणीच्या अभावामुळे चांदीच्या दरात घट झाली. दिल्ली सराफात सोन्याचे दर 21 रुपयांनी वाढून 49,644 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले. तर चांदीचे ( Silver price today ) दर 259 रुपयांनी कमी होऊन 66,784 रुपये प्रति किलो झाले.
अमेरिकेतील आर्थिक पॅकेज जाहीर होण्यास उशीर होत असल्यामुळे व डॉलर कमकुवत होत असल्यामुळे सोन्याचे दर वाढत असल्याचे एचडीएफसी सिक्युरिटीजचे विश्लेषक तपन पटेल यांनी सांगितले.
काही विश्लेषकांनी सांगितले की, विविध बाजाराची परिस्थिती पाहता ( gold price today ) सोन्याचे दर 50 हजार रुपयांच्या खाली राहील्यानंतर सोन्यात गुंतवणूक करू इच्छिणाऱ्यांना काही प्रमाणात खरेदी करण्यास हरकत नाही. सोन्याला तांत्रिक दृष्टया 50,050 रुपयावर चांगला आधार आहे. तर लघु पल्ल्यात 50,920 रुपयांपर्यंत सोन्याचे दर वाढू शकतात.
फेडरल रिझर्व्हने सरकारी रोखे खरेदी करण्याचे धोरण कायम ठेवले आहे. त्याचबरोबर अमेरिकेतील रोजगार निर्मिती थंडावल्यामुळे आणि महागाई वाढत राहण्याची शक्यता असल्यामुळे सोन्याचे दर काही प्रमाणात सध्याच्या पातळीच्या पुढे जातील.