नवी दिल्ली – जागतिक बाजारातील मंद वातावरण कायम आहे. त्याचबरोबर स्थानिक व्यापाऱ्यांकडून मागणी कमी असल्यामुळे गुरुवारी सोन्याच्या दरात 150 रुपयांची घट झाली. मात्र औद्योगिक क्षेत्राकडून मागणी वाढल्यामुळे चांदीचे दर 75 रुपयांनी वाढले.
अखिल भारतीय सराफा संघटनेने जारी केलेल्या माहितीनुसार दिल्ली सराफात गुरुवारी शुद्ध सोन्याचे दर 150 रुपयांनी वाढून 32,870 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले तर स्टॅंडर्ड सोन्याचे दर 150 रुपयांनी वाढून 32,700 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले. गुरुवारी तयार चांदीच्या दरात 75 रुपयांची वाढ होऊन या चांदीचा दर 37,400 रुपये प्रति किलो या पातळीवर गेला. गेल्या पंधरवड्याप्रमाणे आगामी काळातही धातू बाजारात अस्थिरता रेंगाळण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी सूचित केले.