नवी दिल्ली – रुपयाच्या मूल्यात एकतर्फी वाढ होत असल्यामुळे सोन्याची आयात स्वस्त होत आहे. त्यामुळे सोन्याच्या दरात घसरण चालूच आहे. त्याचबरोबर जागतिक बाजारातही सोन्याचे दर कमी होत असल्याचे वातावरण आहे.
दिल्ली सराफात गुरुवारी सोन्याचा दर 28 रुपयांनी कमी होऊन 46,193 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. मात्र हा आधार चांदीला मिळाला नाही. त्यामुळे चांदीचा दर 279 रुपयानी वाढून 62,650 रुपये प्रति किलो या पातळीवर गेला.
सकाळच्या सत्रामध्ये रुपयाचा भाव 6 पैशांनी वाढला होता. या घटनाक्रमाबाबत एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक तपन पटेल यांनी सांगितले की, जागतिक आर्थिक परिस्थिती सुधारू लागली आहे. त्यामुळे शेअर बाजाराचे निर्देशांक वाढत आहेत. सोन्यातील गुंतवणूक शेअर बाजाराकडे वळत असल्याचे वातावरण आहे.
त्यामुळे सोन्याचे दर कमी होत आहेत. आगामी काळात भारतामध्ये उत्सव येणार आहेत. त्याचबरोबर लग्नसराई येणार आहे. त्यामुळे सध्याच्या कमी पातळीवर भारतात सोने खरेदी वाढण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे.