Gold Price Today : सोन्या-चांदीचे दर घसरले; जाणून घ्या आजची १० ग्रॅमची किंमत

नवी दिल्ली : सोन्या-चांदीच्या मागणीतील मंदीमुळे दोन्ही धातूंची घसरण सुरूच आहे. रविवारीच्या व्यापारात सोन्याच्या किंमती पुन्हा एकदा किरकोळ खाली आल्या आहेत. स्थानिक सराफा बाजारात मागणी कमी होत असल्याने सोन्याचे दर दहा ग्रॅम प्रति 110 ग्रॅमने खाली घसरले असून 46,250 रुपयांवर गेले आहेत.

शनिवारी सोन्याचा भाव दहा ग्रॅम 46,360 रुपयांवर बंद झाला होता. ताज्याआकडेवारीनुसार दिल्लीतील 22 कॅरेट सोन्याची किंमत 46,250 आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 50,470 रुपये आहे. मुंबईत 22 कॅरेटचे सोने 44,950 आणि 24 कॅरेट सोन्याचे 45,950 वर चालत आहे. कोलकातामध्ये 22 कॅरेट सोन्याचे 47,440 रुपये, तर 24 कॅरेटचे सोने 49,710 रुपये आहे.

चेन्नईत सोन्याच्या किंमतींमध्येही घट झाली आहे. येथे 22 कॅरेट सोन्याची किंमत 44,770 आणि 24 कॅरेटची किंमत 48,840 रुपये आहे. या किंमती प्रति 10 ग्रॅम सोन्याचे आहेत. आजच्या बाजारात चांदीची किंमत 68 हजार 700 रुपये प्रति किलोग्रॅम आहेत. दिल्लीत चांदी 68,7००रुपयांप्रमाणे विक्री होत आहे आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.