नवी दिल्ली – जागतिक बाजारात दर घसरल्यामुळे भारतीय बाजारात मंगळवारी सोन्याचे दर आणखी कमी झाले. आर्थिक परिस्थिती सुधारत असल्यामुळे डॉलर वधारत आहे. त्यामुळे जागतिक पातळीवर सोन्याचे दर कमी पातळीवर आहेत असे विश्लेषकांनी सांगितले.
मंगळवारी दिल्ली सराफात सोन्याचे दर 138 रुपयांनी कमी होऊन 44,113 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले. तयार चांदीचा दर 320 रुपयांनी कमी होऊन 63,212 रुपये प्रति किलो झाला.
जागतिक बाजारात सोन्याचे दर कमी होऊन 1,698 डॉलर प्रती औंस तर चांदीचा दर कमी होऊन 24.49 डॉलर प्रती औंस झाला. एचडीएफसी, सिक्युरिटीज या संस्थेचे विश्लेषक तपन पटेल यांनी सांगितले की, जागतिक वायदे बाजारात सोन्याचे दर कमी होत आहेत. कारण डॉलर वधारला आहे. त्यामुळे त्याचा परिणाम बाजारातही होऊ लागला आहे.