नवी दिल्ली – जागतिक बाजारातील संकेतानुसार दिल्ली सराफात बुधवारी सोन्याच्या दरात 63 रुपयांची वाढ होऊन सोन्याचा दर 46,329 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला.
त्याचबरोबर तयार चांदीचा दर 371 रुपयांनी वाढून 60,788 रुपये प्रति किलो झाला. जागतिक बाजारात सोन्याचा दर वाढून 1,768 डॉलर व चांदीचा दर 22.80 प्रती डॉलर झाला.
जागतिक बाजारातील संकेतानुसार सध्या सोन्याचे दर कमी – जास्त होत असल्याचे एचडीएफसी सिक्युरिटीज या संस्थेचे विश्लेषक तपन पटेल यांनी सांगितले.