नवी दिल्ली – जागतिक बाजारात सोन्याचे दर वाढल्यामुळे दिल्ली सराफातही सोने आणि चांदीच्या दरात वाढ झाली. आज दिल्ली सराफात सोन्याचे दर 402 रुपयांनी वाढून 47,235 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले.
दिल्ली सराफात चांदीचे दरही आज 893 रुपयांनी वाढून 49,344 रुपये प्रति किलो झाले. जागतिक बाजारात आज सोन्याचे दर 1705 डॉलर प्रति औंस या पातळीवर गेलेले आहेत. लॉक डाऊनमुळे सराफा व्यवहार बऱ्याच काळापासून बंद होते. गेल्या आठवड्यामध्ये दिल्ली सराफात व्यवहार थोड्या प्रमाणात सुरू झाले आहेत.