नवी दिल्ली – दागिने उत्पादकाकडून खरेदी वाढल्यामुळे व जागतिक बाजारातून सकारात्मक संकेत आल्यामुळे दिल्ली सराफात सोन्याच्या दरात शंभर रुपयांनी तर चांदीच्या दरात दोनशे रुपयांनी वाढ झाली.
अखिल भारतीय सराफा संघटनेने सांगितले की, दिल्लीत शुद्ध सोन्याचे दर शंभर रुपयांनी वाढवून 32,770 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले तर स्टॅंडर्ड सोन्याचे दर शंभर रुपयांनी वाढून 32,600 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले. शनिवारी गुढीपाडव्यामुळे सोन्याची खरेदी वाढण्याची शक्यता आहेत. काल सोन्याच्या दरात 180 रुपयांची घट झाली होती. दिल्ली सराफात तयार चांदीचे दर शुक्रवारी दोनशे रुपयांनी वाढून 38,530 रुपये प्रति किलो झाले.