नवी दिल्ली – नवीन वर्षाच्या सुरुवातीला सोन्याच्या दरात 144 रुपयांची वाढ होऊन सोन्याचा भाव 46,887 रुपये प्रति दहा ग्रॅम झाला.
जागतिक बाजारात सोन्याचा भाव वाढल्यामुळे दिल्ली सराफात सोन्याचा दर वाढला असल्याचे विश्लेषकांनी सांगितले. दिल्ली सरफात तयार चांदीचा दर 664 रुपयांनी वाढून 61,015 प्रति किलो या पातळीवर गेला.
जागतिक बाजारात सोन्याचा दर वाढून 1,816 डॉलर व तयार चांदीचा दर 23.15 डॉलर प्रति औंस झाला. जागतिक बाजारांत आगामी काही काळ सुट्टी असल्यामुळे धातूंचे दर या आठवड्यात स्थिर राहण्याची शक्यता आहे.