Gold Price : सोने घसरले चांदी; वधारली

नवी दिल्ली – जागतिक बाजारातून संमिश्र संदेश आल्यानंतर भारतीय बाजारात सोन्याचे दर घसरले तर चांदीच्या दरात वाढ झाली.

दिल्ली सराफात सोन्याचे दर 48 रुपयांनी कमी होऊन 47,814 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले. तर चांदीचा दर 340 रुपयांनी वाढून 70,589 रुपये प्रति किलो झाला.

जागतिक बाजारात सोन्याचे दर 1,859 डॉलर तर चांदीचे दर 27.77 डॉलर प्रती औंस या पातळीवर स्थिर होते. याबाबत बोलताना एचडीएफसी सिक्‍युरिटीज या संस्थेचे विश्‍लेषक तपन पटेल यांनी सांगितले की, बुधवारी अमेरिकेच्या फेडरल रिझर्वचे पतधोरण जाहीर होणार आहे. त्यामुळेच सर्वच बाजारातून संमिश्र संदेश मिळत आहेत. त्याचा परिणाम सोने आणि चांदीच्या दरावर झाला. उद्या या बाजाराल मिळण्याची शक्‍यता आहे.

मोतीलाल ओसवाल फायनान्शिअल सर्व्हिसेसचे उपाध्यक्ष नवनीत दमाणी यांनी सांगितले की अपेक्षेप्रमाणे आज सोने आणि चांदीच्या दरामध्ये बरेच चढ-उतार झाले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.