नवी दिल्ली – जागतिक बाजारात सोन्याचे दर वाढल्यामुळे भारतीय बाजारातही सोन्याचे दर वाढल्याचे दिसून आले. मात्र चांदीचा दर सध्या उच्च पातळीवर असल्यामुळे बराच नफा काढून घेतला गेल्यामुळे चांदीच्या दरात घट नोंदली गेली.
सोमवारी दिल्ली सराफात सोन्याचा भाव 195 रुपयांनी वाढून 48,608 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. त्याचबरोबर तयार चांदीचा दर मात्र 15 रुपयांनी कमी होऊन 70,521 रुपये प्रति किलो या पातळीवर गेला.
जागतिक बाजारात सोन्याचा दर सध्या वाढून 1,905 हॉलर तर चांदीचा दर 27.95 डॉलर या पातळीवर गेला. निर्देशांक मोठ्या प्रमाणात वाढत असल्यामुळे सोने आणि चांदीचे दर आगामी काळात अस्थिर राहण्याची शक्यता असल्याचे एचडीएफसी सिक्युरिटीज या संस्थेचे विश्लेषक तपन पटेल यांनी सांगितले.