रांजणगाव गणपती (वार्ताहर) -श्रीक्षेत्र रांजणगाव गणपती देवस्थान ट्रस्टच्या वतीने पहाटे 5 वाजता अभिषेक व नैमित्तीक पूजा करण्यात आली. देवस्थानच्या वतीने दुपारी बारा वाजता महापूजा व महानैवेद्य करण्यात आला. तसेच यावेळी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष ऍड. विजयराज दरेकर, उपाध्यक्ष प्रा. नारायण पाचुंदकर, सचिव डॉ. संतोष दुंडे, व्यवस्थापक बाळासाहेब गोऱ्हे, हिशोबनीस संतोष रणपिसे तसेच पुजारी प्रसाद कुलकर्णी, मकरंद कुलकर्णी उपस्थित होते.
प्रगतशील शेतकरी नानाभाऊ पाचुंदकर यांच्या वतीने मंदिर परिसरात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. करोना विषाणूचा प्रसार व प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून मंदिर भाविकांना दर्शनासाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात आले आहे. परंतु लॉकडाऊन काळातही श्रींची दैनंदिन पूजा, धार्मिक विधी नित्यनियमाने सुरू आहेत, अशी माहिती अध्यक्ष ऍड. विजयराज दरेकर यांनी यावेळी दिली.