मनु भाकरने सुवर्णपदकासह रचला इतिहास

नवी दिल्ली: भारताच्या मनु भाकरने पुटियान (चीन) येथे सुरु असलेल्या वर्ल्ड कप फायनल मध्ये महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात आज सुवर्णपदक मिळवून इतिहास रचला आहे.

आंतरराष्ट्रीय शूटिंग स्पोर्ट फेडरेशनच्या (आयएसएसएफ) प्रतिष्ठेच्या हंगामात १७ वर्षीय मनू भाकरने २४४. गुणांची नोंद केली. तिचा प्रतिस्पर्धी यशस्विनीसिंग देसवालने या स्पर्धेच्या अंतिम फेरीत सहावे स्थान मिळविले.

सर्बियाच्या झोराना अरुणोविकने २४१.९ ने रौप्यपदक जिंकले, तर चीनच्या क्वान वांगने २२१.८ गुणांसह कांस्यपदक जिंकले. पुरुषांच्या 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात अभिषेक वर्मा आणि सौरभ चौधरी यांनी अंतिम फेरीसाठी पात्रता दर्शविली. वर्माने ५८८ गुणांसह प्रथम स्थान पटकाविला तर चौधरी ५८१ गुणांसह सातव्या क्रमांकावर आहेत.

दरम्यान मनु भाकरने मिळवलेल्या यशाबद्दल केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ट्विट करून तिचे अभिनंदन केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.