महाराष्ट्राच्या दियाला सुवर्णपदक

हावडा: महाराष्ट्राच्या युवा टेबल टेनिस खेळाडूंनी युटीटी राष्ट्रीय रॅंकिंग टेबल टेनिस अजिंक्‍यपद (पूर्व विभाग) पाच पदकांची कमाई केली. ज्यामध्ये कॅडेट, सब ज्युनियर व ज्युनियर गटात सुवर्ण आणि रौप्यपदकाचा समावेश आहे.

मुलींच्या ज्युनियर गटात दोन महाराष्ट्र खेळाडूंनी अंतिम फेरीत धडक मारली. दिया चितळे व स्वस्तिका घोष यांमध्ये अंतिम सामना रंगला. दियाने यामध्ये बाजी मारली. दिया ही चांगल्या फॉर्मसह स्वस्तिकावर 4-1 अशा फरकाने विजय मिळवत सुवर्णपदक मिळवले तर, स्वस्तिकाला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.

मुलांच्या सब ज्युनियर गटात राजवीर शाहला तमिळनाडूच्या सुरेश राज प्रेयेशने 1-4 अशा फरकाने नमविले. त्यामुळे त्याला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. सब ज्युनियर मुलींच्या गटात तनिषा कोटेचाला दिल्लीच्या लक्षिका नारंगकडून 2-4 असे पराभूत व्हावे लागले.

मुलींच्या कॅडेट गटात पश्‍चिम बंगालच्या रुप्सा घोषालने जेनिफर वर्गिसला 4-1 असे पराभूत व्हावे लागल्याने कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.

Leave A Reply

Your email address will not be published.