बर्मिंगहॅम – राष्ट्रकुल स्पर्धेत भारताची पॅरा टेबल महिला टेनिसपटू भाविना पटेल ही पदकाची दावेदार मानली जात आहे. या स्पर्धेत भारताला पदक मिळवून देण्याबाबत तिने आत्मविश्वास व्यक्त केला आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी भारतीय पॅरा टेबल टेनिस पथक रविवारी बर्मिंगहॅममध्ये दाखल झाली आहे.
Table Tennis Team India! Ready for our challenge ahead. Let’s go!
Jai Hind 🇮🇳 🏓@birminghamcg22 @WeAreTeamIndia pic.twitter.com/CVljiP1w0I— Bhavina Patel PLY (@BhavinaOfficial) July 26, 2022
टोकियो पॅरालिम्पिकमध्ये भाविना पटेलने भारतासाठी रौप्यपदक जिंकले होते. या स्पर्धेतील महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात तिला चीनच्या झोउ यिंगकडून 3-0ने पराभव स्वीकारावा लागला होता. मात्र, बर्मिंगहॅम राष्ट्रकुल स्पर्धेत तिच्याकडून सुवर्णपदकाची अपेक्षा केली जात आहे.
या स्पर्धा खेळण्यासाठी बर्मिंगहॅम येथे पोहोचलेल्या भाविना पटेल म्हणाली, देशाला माझ्याकडून पदकाची अपेक्षा आहे, ही माझ्यासाठी चांगली गोष्ट आहे. मी नेहमीच कोणत्याही दबावाखाली न राहता माझं सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करत आली आहे. ज्यावेळी तुम्ही दबावात खेळतात, तेव्हा तुमच्या खेळावर परिणाम होतो, असे तिने एएनआयशी बोलताना सांगितले.
Check out @BhavinaOfficial‘s training session at CWG @birminghamcg22 🤩🤩#Cheer4India #IndiaTaiyaarHai https://t.co/tkYm6FuweF
— SAI Media (@Media_SAI) July 25, 2022
तसेच राज अरविंद पहिल्यांदाच या स्पर्धेत सहभागी झाला आहे. या स्पर्धेत चांगली कामगिरी करून दाखवण्याचा त्याचा प्रयत्न असेल, असा विश्वास राज अरविंदने व्यक्त केला. “एक खेळाडू म्हणून ही माझी पहिलीच स्पर्धा आहे. या राष्ट्रकुल स्पर्धेत पदक मिळवण्यासाठी मी गेल्या 6-8 महिन्यांपासून तयारी करत आहे. आमच्याकडे भाविना पटेल आहेत. पॅरालिम्पिकमधील ती रौप्यपदक विजेती आहे. आम्ही भारतासाठी पदक जिंकण्यावर लक्ष केंद्रित करत असल्याचे त्याने सांगितले.