नगर – स्वस्तात सोन्याचे आमिष दाखवून गंडा घालणाऱ्या आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली. काढण्या पेन्सील्या भोसले (वय 60, रा. कोळगाव, ता. श्रीगोंदा) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रोहन खंडागळे, पोना मल्लिकार्जुन बनकर, दिगंबर कारखिले, रविंद्र कर्डिले, संदीप दरंदले, योगेश सातपुते आदींच्या पथकाने ही कारवाई केली.
गुजरातच्या एका महिलेसह तिच्या नातेवाईकांना स्वस्तात सोने देण्याचे फोनवर सांगून त्यांना नगरला बोलावले. मात्र, त्यानंतर त्यांना 8 ते 10 जणांनी मारहाण करून त्यांच्याजवळील 15 लाखाची रक्कम 20 हजार किंमतीचे मोबाईल असा ऐवज चोरून नेला.