नवी दिल्ली- करोना व्हायरसमुळे सोन्याची खरेदी कमी होत आहे. परिणामी पहिल्या सहा महिन्यांत सोन्याची आयात 57 टक्क्यांनी कमी झाली आहे.
पहिल्या सहा महिन्यांत भारताने 6.8 अब्ज डॉलर म्हणजे 50 हजार 658 कोटी रुपयांच्या सोन्याची आयात केली. गेल्या वर्षी पहिल्या सहा महिन्यांमध्ये 15.8 अब्ज डॉलरच्या म्हणजे 1.1 लाख कोटी रुपयाच्या सोन्याची आयात झाली होती. पहिल्या सहा महिन्यांत चांदीची आयात 63 टक्क्यांनी कमी होऊन 1,543 कोटी रुपयांची झाली आहे. यामुळे व्यापारातील तूट कमी होत आहे.