उत्तर प्रदेशातून निघणार सोन्याचा धूर

साडेतीन हजार टन सुवर्ण साठे आढळले, सोनभद्र जिल्ह्यातील घटना

लखनौ : उत्तर प्रदेशमधील सोनभद्र जिल्हा नक्षलवादी घटना आणि गरीबीसाठी ओळखला जातो. मात्र, लवकरच या गोष्टी बदलल्या जाणार आहेत. भारतीय भूगर्भ सर्वेक्षण आणि उत्तर प्रदेश भूगर्भ संचनालय तसेच खाण तज्ज्ञांनी तेथे सोन्याच्या दोन खाणींचा शोध लावला आहे. या खाणी सोनभद्राजवळ सोन पाहाडी येथे आढळल्या आहेत. या भागातील मातीतून जवळपास साडेतीन हजार टन सोने मिळणार असण्याची शक्‍यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

सध्या भारताकडे असणाऱ्या सोन्याच्या साठ्याच्या पाचपट सोने येथे असावे असे अनुमान काढले जाते. भारताचा सोन्याचा साठा वाढून 618 टन झाला होता. त्याची किंमत डिसेंबर 2019मध्ये 27.831 अमेरिकन डॉलर्स एवढी होती. जागतिक सुवर्ण परिषदेच्या अहवालानुसार भारत हा जगातील दहाव्या क्रमांकाचा साठा असणारा देश आहे. हा प्रदेश भाडे करारावर देण्याचा विचार सरकार करत होते. त्यासाठी हे सर्वेक्षण करण्यात आले. सोनपहाडी आणि हार्दी खेत येथे हे सोन्याचे साठे आढळून आले. जीएसआयला सोनपहाडीत तब्बल दोन हजार 700 टन सोने अपेक्षीत आहे. तर हार्दी खेत येथे 650टन सोने िंमळेल असे वाटते, असे खाण अधिकारी के. के. राय यांनी सांगितले.

या भागातील जमीनींचा खाणींचे वाटप करण्यासाठी सोनभद्रा येथे सात जणांचे पथक पाठवण्यात आले आहे. या खाणींसाठी इ टेंडरिंग करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे उत्तर प्रदेश सरकारमधील सूत्रांनी सांगितले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.