पुणे- विश्रांतवाडी पोलिसांनी शहरात धुमाकूळ घालणाऱ्या एका सराईत सोन साखळी चोरास चिकाटीने तपास करत जेरबंद केले. संबंधीत गुन्हेगार पोलिसांना चकवा देण्यासाठी गुन्हा करताना सातत्याने चोरीच्या वाहनांची अदलाबदल करत होता. इतकेच नव्हे तर सीसीटीव्हीत सापडू नये म्हणून गल्लीबोळांचा वापर करत होता. मात्र पोलिसांनी सलग दिड महिणे 300 सीसीटीव्ही फुटेजच्या 300 तासांच्या रेकॉर्डींग तपासत त्याचा मागच काढला. यासाठी त्यांना तब्बल 400 किलोमीटर फिरावे लागले. त्याची खबर मिळताच फिल्मी स्टाईल पाठलाग करुन त्याला बेड्या ठोकण्यात आल्या. यामुळे कानूनके हाथ लंबे होते हे याचा पुन्हा एकदा प्रत्यय आला. विश्रांतवाडी पोलिसांना गुन्हे शाखेच्या युनिट चारने मदत केली.
तपासाने वेग घेतला. तपासात आरोपीची मोडल लक्षात घेता, आरोपी हा ओळख लपवण्यासाठी हेल्मेटचा वापर करत होता. तसेच वेगवेगळ्या ठिकाणांहून दुचाकी चोरुन त्या वेगवेगळ्या ठिकाणी लावून ठेवत होता. चोरी करताना वापरलेली दुचाकी रस्त्यात सोडून रस्त्यात लावलेली दुसरी दुचाकी घेऊन तो पुढे जात होता. गाड्यांच अदला बदली केल्याने पोलिसांना आपला माग लागणार नाही असा त्याचा समज होता.
चौकाचौकात सीसीटीव्ही कॅमेरी असल्याने तो जास्तीत जास्त गल्लीबोळांचा वापर करत होता. तपासात तो वारंवार गुन्हा केल्यावर खराडी भागात दुचाकी सोडून गेला असल्याचे निष्पन्न झाले. यामुळे त्याने दुचाकी सोडलेल्या परिसरात पोलिसांनी खबऱ्यांचे जाळे पेरले. एका ठिकाणी लावलेली गाडी तो घेऊन जात असल्याचे पोलीस अंमलदारांना खरब मिळाली. त्यानूसार चौकाचौकात सापळा लावण्यात आला. तो वडगाव शेरी पाण्याच्या टाकीच्या दिशेने जात असताना दिसताच, पाठलाग करण्यात आला. त्याला थोड्याच अंतरावर दुचकी आडवी लावून पकडण्यात आले.
ही कारवाई अपर पोलिस आयुक्त नामदेव चव्हाण, पोलिस उपायुक्त पंकज देशमुख, बच्चन सिंग, सहायक पोलिस आयुक्त रमेश गलांडे, लक्ष्मर बोराटे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक अजय चांदखेडे, पोलीस निरीक्षक रविंद्र कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक लहु सातपुते, झाजड, पोलिस अंमलदार विजय सावंत, दिपक चव्हाण, यशवंत किर्वे, किशोर दुशिंग, अझरुद्दीन पठाण, प्रफुल्ल मोरे, रिहाण पठाण, उत्तम गट, शेखर गराडे, संदीप देवकाते, अनिकेत भिंगारे, सतीष मुंढे, लोहकर, संजय अढारी, विशाल गाडे, विनोद महाजन, प्रविण भालचिम, अशोक शेलार यांच्या पथकाने केली