नवी दिल्ली – जागतिक पातळीवर महागाई वाढण्याच्या शक्यतेमुळे सोन्याच्या दरात वाढ चालूच आहे. दिल्ली सराफात सोन्याचा दर 93 रुपयांनी वाढून 47,005 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. तयार चांदीचा दर दिल्ली सराफात 59 रुपयांनी वाढून 61,005 रुपये प्रति किलो झाला.
रुपया घसरल्यामुळे आणि जागतिक बाजारात सोन्याच्या किमती वाढत असल्यामुळे भारतीय बाजारात सोन्याच्या किमती वाढत असल्याचे एचडीएफसी सिक्युरिटीज संस्थेचे विश्लेषक तपन पटेल यांनी सांगितले. सकाळच्या सत्रात रुपयाचा भाव 26 पैशांनी कोसळून 74 रुपये 16 पैसे प्रति डॉलर झाला होता. जागतिक बाजारात सोन्याचा दर 1,826 डॉलर व चांदीचा दर 13.19 हॉलर प्रति औंस या पातळीवर होता.