मुंबई – जागतिक बाजारात सोन्याचे दर वाढल्यामुळे भारतीय सराफात सोन्याच्या दरात सोमवारी वाढ नोंदली गेली. सोन्याचा दर 146 रुपयांनी वाढून 47,997 रुपये प्रति दहा ग्रॅम झाला. चांदीचा दर 635 रुपयांनी वाढून 61,391 रुपये प्रति किलो या पातळीवर गेला. जागतिक बाजारात सोन्याचा दर वाढून 1,812 डॉलर व चांदीचा दर 22.75 डॉलर प्रति औंस या पातळीवर होता.
एचडीएफसी सिक्युरिटीज या संस्थेचे विश्लेषक तपन पटेल यांनी सांगितले की, जागतिक बाजारात डॉलर कमकुवत झाल्यामुळे सोन्याच्या दरात वाढ झाली. त्यामुळे भारतीय सराफातही सोने आणि चांदीच्या दरात सोमवारी वाढ नोंदली गेली. अमेरिका लवकरच व्याजदरात वाढ करणार असल्यामुळे विविध बाजारांमध्ये काही प्रमाणात अस्थिरता रेंगाळत असल्याचे त्यांनी सांगितले.