नवी दिल्ली – जागतिक परिस्थिती खराब असतानाच रशिया- युक्रेन युद्ध रेंगाळले असल्यामुळे सोने आणि चांदीचे दर अस्थिर आहेत. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी दिल्ली सराफात सोन्याचा दर 231 रुपयांनी वाढून 50,608 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला.
त्याचबरोबर तयार चांदीचा दर 285 रुपयांनी वाढून 61.657 रुपये प्रति किलो झाला. जागतिक बाजारात सोन्याचा दर वाढवून 1,845 डॉलर व चांदीचा दर 21.92 डॉलर प्रति औंस या पातळीवर गेला. युध्द संपत नाही तोपर्यंत स्पॉट मार्केट व वायदे बाजारात सोने आणि चांदीचे दर अस्थिर राहण्याची शक्यता असल्याचे एचडीएफसी सिक्युरिटीज या संस्थेचे विश्लेषक तपन पटेल यांनी सांगितले.