नवी दिल्ली – जागतिक पातळीवर सोन्याचे दर कमी झाले असले तरी मागणी वाढल्यामुळे देशांतर्गत बाजारपेठेत सोने आणि चांदीचे दर वाढले.
नवी दिल्ली सराफा भागात शुक्रवारी शुद्ध सोन्याचे दर 200 रुपयांनी वाढून 32,870 रुपये प्रति 10 ग्रॅम तर स्टॅंडर्ड सोन्याचे दर 200 रुपयांनी वाढून 32,700 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले. तयार चांदीचे दर 150 रुपयांनी वाढून 37,550 रुपये प्रति किलो झाले.