Gold Price | सोन्याच्या दरात मोठी वाढ; जाणून घ्या आजचा 10ग्रामचा दर

नवी दिल्ली, दि. 3- जागतिक बाजारात सोन्याचे दर वाढले आहेत. त्याचबरोबर रुपयाचे मूल्य सध्या कमी पातळीवर असल्यामुळे भारतीय सराफात सोन्याच्या आणि चांदीच्या दरात बरीच वाढ नोंदली गेली.

दिल्ली सराफात सोमवारी सोन्याचा दर 310 रुपयांनी वाढून 46,580 रुपये प्रति 10 ग्राम या पातळीवर गेला. तर चांदीचा दर 580 रुपयांनी वाढून 67,849 रुपये प्रति किलो झाला. जागतिक बाजारात सोन्याचा दर वाढून 1,777 डॉलर व चांदीचा दर 26.06 डॉलर प्रति औंस या पातळीवर गेला.

याबाबत एचडीएफसी सिक्‍युरिटीज या संस्थेचे विश्‍लेषक तपन पटेल यांनी सांगितले की जागतिक वायदे बाजारात सोन्याचे दर वाढत असल्यामुळे स्पॉट मार्केटमध्ये सोन्याचे दर वाढले आहेत. सकाळच्या सत्रामध्ये रुपयाचा भाव घसरला त्यामुळे आयात महाग होते. या कारणांमुळे भारतीय सराफात सोन्याचे दर वाढले असल्याचे दिसून येते. त्याचबरोबर डॉलरचा भाव थोडा कमकुवत असल्यामुळे सोन्याचा दर वाढत असल्याचे त्यांना वाटते.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.