#Video : ठाकुरबुवा येथे माऊलींचे तिसरे गोल रिंगण उत्साहात संपन्न

सोलापूर – माऊली, माऊली’चा गगनभेदी जयघोष, आणि टाळ मृदुंगाचा गजर अशा भक्तीमय वातावरणात संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे तिसरे गोल रिंगण आज सकाळी 9 वाजता ठाकूर बुवा समाधी येथे पार पडले. यावेळी अश्‍वांची चित्तथरारक धाव आणि त्यांच्यातील रिंगणाचा सोहळा पाहण्यासाठी लाखो वारकऱ्यांच्या उत्साहाने वातावरण दुमदुमून गेले. यावेळी लाखो वैष्णवांनी हा रिंगण सोहळा अनुभवला.

ठाकूर बुवा समाधी येथील रिंगणानंतर तोंडले येथे नंदाच्या ओढ्यावर माऊलींच्या पालखीचा दुपारचा विसावा होणार आहे. संत ज्ञानेश्वर महाराज व संत सोपानदेव या बंधू भेटीचा सोहळा टप्पा येथे होणार आहे. त्यानंतर माऊली, संत तुकोबाराय व सोपानकाका यांचे पालखी सोहळे पंढरपूर तालुक्यात प्रवेश करतील. माऊलीचा सोहळा भंडीशेगाव येथे व तुकोबाराय यांची पालखी आज पिराचीकुरोली येथे मुक्कामी असणार आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.