मुंबई – गोचिडांमुळे पाळीव जनावरांमध्ये क्रायमिन कॉंगो हेमोरेजिक तापाची साथ पसरत असल्याने राज्याच्या सीमा भागातल्या पशुपालक आणि मांस विक्रेत्यांना सतर्क राहाण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
हा रोग गुजरातमधून राज्याच्या सीमेवर असणाऱ्या जिल्ह्यात पसरण्याची शक्यता असल्याने पशुसंवर्धन आयुक्त कार्यालयाने याबाबत परिपत्रक जारी केले आहे.
हा आजार बाधित जनावरांकडून माणसांमध्ये पसरत असल्याने सीमा भागातल्या पशुपालकांना या साथीबाबत जास्त सतर्क आणि जागरूक राहण्याचा इशारा दिला आहे.
पालघर जिल्हा पशुसंवर्धन विभागाने सर्व आवश्यक ती खबरदारी घेऊन प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवण्याबाबत निर्देश दिले आहेत.