पुणे – येवलेवाडी येथे एका गोडाऊनमध्ये भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. याची माहिती समजताच अग्निशामक दलाच्या सात गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून जवान आग विझविण्याचे शर्थीचे प्रयत्न करत आहेत.
येवलेवाडी येथे तेल व खाद्यपदार्थ गोडाऊनमधील एका ट्रकने पेट घेतला व आग लागल्याची प्राथमिक माहिती समजत आहे. सकाळी 7.15 च्या सुमारास ही घटना घडली. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही.