मुख्यमंत्र्यांना देवीने ‘सुबुद्धी’ द्यावी

नवनीत राणा यांची ठाकरे सरकारवर जोरदार टीका

मुंबई  –   राज्यातील करोनामुळे बंद ठेवण्यात आलेली मंदिरे पुन्हा उघडली जावीत, अशी मागणी  भाजपा नेत्यांकडून होत आहे. याच मुद्यावरून आता अमरावती जिल्ह्याच्या खासदार नवनीत राणा यांनी  मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे.

वृत्त वाहिनीशी बोलतांना नवनीत राणा यांनी मंदिरे पुन्हा उघडली जावीत या मुद्यावरून  ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली आहे.

‘राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना राज्यातील रेस्टॉरंट, बार, दारूची दुकाने सुरू झाली आहे. मात्र, राज्यातील धार्मिक स्थळं मात्र अजूनही बंदच आहे. मंदिरा’लयच सुरू करायचे होते. मात्र, “म” वरचा अनुस्वार चुकल्याने राज्यातील  मदिरालय सुरू झाली.’ अशी खोचक टीका अमरावती जिल्ह्याच्या खासदार नवनीत राणा यांनी केली.

त्या पुढे म्हणाल्या,’नवरात्र उत्सवाच्या काळात महिला दहा दिवस उपवास करतात. देवीचे दर्शन घेतात, मात्र, मंदिरं बंद असल्यामुळे आता महिलांना देव दर्शनापासून मुकावं लागणार असल्याने नवनीत राणा यांनी मुख्यमंत्र्यांवर नाराजी व्यक्त करत त्यांना देवीने सुबुद्धी द्यावी आणि लवकरच मंदिर सुरू व्हावे’अशी अपेक्षा व्यक्त केली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.