‘ईश्वर तुम्हाला सदा सुखी ठेवो..”, दीदींकडून जम्बो कोविड रुग्णालयाच्या कामाचे कौतुक

दीदींनी स्वहस्ताक्षरात पत्र लिहत केले कौतुक

मुंबई – गानसाम्राज्ञी आणि भारतरत्न ‘लता मंगेशकर’ यांनी मुंबई महापालिकेच्या जम्बाे कोविड रुग्णालयाच्या कामाचे कौतुक केले. दीदींनी त्यांच्या स्वहस्ताक्षरात एक पत्र लिहले आहे. “आपण महाराष्ट्रासाठी, दिवस-रात्र काम करीत आहात. ईश्वर तुम्हाला सदा सुखी ठेवो, अशी मी मंगल कामना करते’ असं दीदी म्हणाल्या आहेत.

सध्या देशासह महाराष्ट्रात देखील दिवसागणिक कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढत असून, पुन्हा एकदा नागरिकांचा या भयानक विषाणूमुळे मृत्यू झाला आहे. या चिंताजनक परिस्थितीमध्ये मुंबई महानगरपालिका ज्या पद्धतीने कोरोना विषाणूशी लढा देत आहे त्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. दीदींनी सुद्धा पत्र लिहीत वांद्रे-कुर्ला कोविड रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर राजेश डेरे यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

दीदी आपल्या पत्रात म्हणतात… “आपण महाराष्ट्रासाठी, दिवस-रात्र काम करीत आहात. ईश्वर तुम्हाला सदा सुखी ठेवो, अशी मी मंगल कामना करते. नमस्कार.!’ असं दीदी म्हणाल्या. दरम्यान, लता दीदींच्या या पत्रामुळे कर्मचाऱ्यांना रुग्णसेवा करण्याचे बळ मिळाले आहे. अशी भावना कोविड रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर राजेश डेरे यांनी व्यक्त केली. 

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.