अहमदनगर : काही दिवसांपूर्वी मोदी बोकडाला लाखो रुपयांचे ग्राहक मिळाला होता. त्यामुळे सर्वत्र आश्यर्य व्यक्त करण्यात येत होते. अशीच काही घटना आता अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यात घडली आहे. एका बकरीला तब्बल बुलेट बाईक एवढी किंमती मिळाली आहे.
नेवासा येथील शेतकऱ्याचं नशीब एका आफ्रिकन बकरीने पालटलं आहे. भेंडा येथे या आफ्रिकन बकरीची किंमत 1 लाख 51 हजार रूपये आली आहे. एका बुलेटची किंमत देखील ऐवढीच असते.
भेंडा येथील शेतकरी संदीप परसराम मिसाळ यांच्या मालकीची ती बकरी होती. मिसाळ यांचे समृद्धी बोअर गोट फॉर्म आहे. त्यांच्या आफ्रिकन जातीच्या एका बकरीचे वजन दरोरोज 300 ते 350 ग्रॅमने वाढते. ही या शेळीची खासियत आहे. त्यामुळे या बकरीला बाजारात मोठी मागणी असल्याचं मिसाळ यांनी म्हटले आहे.
आफ्रिकन बकरीचे वजन दिवसाला 300 ते 350 ग्रॅमने वाढते. ही बकरी तिसऱ्या वेताला असून साऊथ आफ्रिकामधून आयात केलेल्या मेलपासून मेटीन केली आहे. या फिमेलची होणारी पैदास पिवरलाईनमध्ये स्टड होते. या बकरीच्या पिल्लांची वजनवाढ दिवसाला 400 ते 450 ग्रॅम वाढते. बकरीला एवढी किंमत मिळाल्यानंतर संदीप मिसाळ यांनी फटाके फोडून आनंद व्यक्त केला. आफ्रिकन बकरी एका वेताना २ लाख रुपये उत्पन्न देते, असंही मिसाळ यांनी सांगितलं.