गोवा बनावटीचे विदेशी मद्य जप्त; सांगलीच्या तरुणास अटक

कोल्हापूर – लोकसभा निवडणुका आणि गावातील यात्रांच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूरच्या उत्पादन शुल्क विभागाने बेकायदेशीर गोवा बनावटीचे विदेशी मद्य वाहतूक करणारा टेम्पो आज पकडला आहे. कोल्हापूर शहरातील उमा टॉकीज ते आर्वीम ख्रिश्चन हायस्कुल रोड वर उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली.

या कारवाईत महिंद्रा कंपनीचा चार चाकी टेम्पो आणि १४४ लिटर गोवा बनावटीचे विदेशी मद्य असा सुमारे ३ लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी सचिन गणपती शिंदे या सांगलीच्या युवकाला अटक केली आहे. सचिन शिंदे वृद्ध मद्य निषेध अधिनियम 1 9 4 9 नुसार जामीनपात्र गुन्हा दाखल केला असून अधिक तपास राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी करत आहेत.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.